चित्रदुर्ग/प्रतिनिधी
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी एका राहत्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका जोडप्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना होळलकेरे तालुक्यातील टेकलावटी गावात घडली. स्फोटात प्रकाश (वय५४) आणि त्यांची पत्नी सरोजम्मा (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे.
स्फोटानंतर त्यांना तातडीने दावणगिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारात प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात शरीर जाळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.