ऑनलाईन टीम / बीजिंग :
अमेरिकेने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी चीनमधून एन 95 मास्क आयात केले होते. हे मास्क सदोष असल्याचे लक्षात आल्यावर न्यूयॉर्कमधील ब्रूकलिनमधील फेडरल कोर्टात अमेरिकेने तक्रार दाखल केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यानंतर अमेरिकेने एप्रिल महिन्यात डॉक्टर आणि महत्वाच्या व्यक्तींसाठी चीनमधील किंग इयर पॅकेजिंग अँड प्रिटींग कंपनीकडून एन 95 मस्कची खरेदी केली होती. या कंपनीकडून अमेरिकेने 3 टप्प्यात 4 लाख 95 हजार 200 मास्क आयात केले. याची अंदाजे किंमत साडेसात कोटी होती. मात्र, हे मास्क निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर आले. त्यानंतर अमेरिकेने या कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली.
चिनी कंपनीने निकृष्ठ दर्जाची आणि ब्रॅण्डेड नसलेली एन 95 मास्क अमेरिकेमध्ये निर्यात केली, असा आरोप अमेरिकेने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. चिनी कंपनी या प्रकरणात दोषी आढळली तर अमेरिकन कायद्यानुसार कंपनीला 5 लाख डॉलरचा दंड होऊ शकतो.