चिपळूण
तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत पवन तलाव मैदानावर 12, 15 व 19 वर्षे वयोगटासाठी जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा होणार असल्याची माहिती तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुचय रेडिज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, चिपळुणात 20 ते 25 वर्षांनंतर प्रथमच लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धत एकूण 12 संघ खेळणार असून प्रत्येक दिवशी फक्त दोनच सामने खेळवले जाणार आहेत. पुढील वर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. तालुका क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुचय रेडिज, उपाध्यक्षपदी मंगेश तांबे, सचिन पाकळे, सचिवपदी राजेश सुतार, खजिनदारपदी विनित देवधर तर सदस्यपदी केतन पवार, सचिन कुलकर्णी, दशरथ दाभोळकर, विक्रम भोसले, सुनील रेडिज, संतोष चव्हाण, अब्दुल लतिफ परकार, अजिंक्य पवार, प्रशिक्षक उदय काणेकर आदींचा समावेश आहे.