कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेसचा उपक्रम
मालवण/प्रतिनिधी-
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये नैसर्गिक संकट आले व अनेक घरे, बंगले, इमारतीचा मजले या पाण्याच्या प्रवाहात डुबले गेले त्या मुळे घरा घरात चिखल साचून तेथील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. जीवनावश्यक वस्तू खराब झाल्याने त्या टाकून द्याव्या लागल्या आहे. पिण्याच्या पाण्याची धान्य सामानाची अत्यंत तातडीची गरज असल्याने कुडाळ मालवण विधानसभा मधील युवक पदाधिकारी या पूरग्रस्तां बांधवांना तेथे जाऊन त्यांना भेटून त्यांना सहकार्य म्हणून १०५ धान्य किट (तांदूळ, गहू पीठ, ज्वारी, साखर, चहा पावडर, कांदे बटाटे, पोहे, रवा बिस्किट, टूथपेस्ट, ब्रश, साबण) १०० पाणी बॉक्स, तसेच फरसाण व इतर गृहोपयोगी वस्तू कपडे घेऊन सोमवारी दि.२६ जुलै रोजी चिपळूण मधील युवक काँग्रेस पदाधिकारी यांस सोबत घेऊन आझाद नगर, समता नगर, खेड पिंपळ, भेंडी नाका, फरशी पेढे येथील काही भागात घरोघरी – इमारतीं जवळ जाऊन मदत पोचवली.
या वेळी युवक जिल्हा प्रवक्ता अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे चिपळूण विधानसभा युवक अध्यक्ष महेश कदम, कुडाळ विधानसभा अध्यक्ष-मंदार शिरसाट, पल्लवी विजय तारी – उपाध्यक्षा, अमृत हरिश्चंद्र राऊळ (तालुकाअध्यक्ष- मालवण) कुडाळ शहरअध्यक्ष चिन्मय बांदेकर, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, सरदार ताजर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर, योगेश्वर कुर्ले, साजिद सर्गरोह, व रत्नागिरी मधील युवक काँग्रेसचे अविनाश मोहिते गणेश कणेरी व इतर पदाधिकारी यांनी चिपळूण परिसरात फिरून सहकार्याच कर्तव्य पार पाडल.