प्रतिनिधी/ बेळगाव
चिमुकल्या प्रवीणच्या उपचारासाठी आता मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. तरुण भारतने आवाहन करताच पहिल्याच दिवशी फेसबुक प्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून अंदाजे 18 हजार रुपयांची रक्कम तसेच जीवनावश्यक साहित्य प्रवीणच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी येणारा खर्चही उचलण्याची तयारी बेळगावमधील नागरिकांनी दाखविली.
भटक्मया विमुक्त कुटुंबातील एक वर्षाच्या प्रवीणला किडनीचा त्रास जाणवत आहे. त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली असून उर्वरित उपचार सुरू आहे. घरात अठराविश्वे द्रारिद्रय़ असतानाही प्रवीणवर उपचार करण्यासाठी चाललेली धडपड तरुण भारतने दाखविताच बेळगावमधील दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
शनिवारी सकाळी फेसबुक प्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्यासह इतरांनी गणेशपूर शिवमनगर येथील माळावर राहणाऱया प्रवीणच्या कुटुंबाला भेट दिली. राहुल देशपांडे यांनी 10 हजार रुपये, संतोष देशपांडे यांनी 5 हजार रुपये, पूनम मोहनकुमार यांनी 3 हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य दिले. याचबरोबर सम्राट पाटील यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. यावेळी प्रशांत बिर्जे, सतीश पाटील, वरुण कारखानीस यासह इतर सदस्य उपस्थित होते.