चिलीमध्ये दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच प्रतिदिन नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील 7 दिवसांमध्ये यात 14 टक्के तर 14 दिवसांमध्ये 36 टक्क्यांची घट झाल्याची माहिती आरोग्य मंत्री इनरिक पेरिस यांनी दिली आहे. चिलीमध्ये दिवसभरात 1 हजार 712 नवे रुग्ण सापडले असून 117 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7 हजार 186 बाधित दगावले आहेत.
140 आरोग्य कर्मचाऱयांचा मृत्यू
कोरोना संसर्ग फैलावल्यापासून आतापर्यंत 140 आरोग्य कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे. तर 5 हजार डॉक्टर्स आणि परिचारिकांना बाधा झाली आहे. या सर्वांना सन्मान देत आरोग्य नियमांचे पालन करणेचे गरजेचे असल्याचे विधान इराणच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. इराणमध्ये आतापर्यंत 2,67,061 बाधित सापडले असून 13,608 जण संसर्गामुळे दगावले आहेत.