3 फुटांपेक्षा अधिक वाढत नाही कुणाची उंची
सध्या सोशल मीडियावर एका शापित गावाची चर्चा होतेय. हे गाव चीनच्या शिचुआन प्रांतात आहे. या गावात राहणाऱया लोकांची उंची 3 फुटांपेक्षा अधिक वाढत नाही. चीनच्या शिचुआनच्या यांग्सी गावाचे रहस्य अद्याप कुणालाच सोडविता आलेले नाही.
या गावातील बहुतांश लोकसंख्या बुटकी आहे. या गावात राहणाऱया बहुतांश लोकांची उंची दोन ते तीन फुटांपर्यंतच वाढते. गावातील 50 टक्के लोकसंख्या कमी उंची असलेली आहे.
या गावात जन्मलेली मुले 5-7 वर्षांपर्यंत इतरांप्रमाणेच मोठी होतात. पण या या वयानंतर त्यांची उंची वाढणे बंद होते. त्यानंतर अधिकाधिक त्यांची उंची 3 फूट 10 इंचापर्यंतच वाढते. उंचीला बेक लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बहुतांश लोक याला शाप मानतात. यांग्सी गाव शापित असल्याने लोकांची उंची वाढत नसल्याचे त्यांचे सांगणे आहे.
तर परिसरातील लोक देखील याला वाईट शक्तीचा प्रकोप ठरवितात. वैज्ञानिकांनी देखील यामागील कारण जाणण्याचा प्रयत्न केला. गावातील मातीमध्ये पारा म्हणजेच मर्क्युरी अधिक प्रमाणात असल्याने येथील लोकांची उंची वाढत नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. तर जपानकडून चीनच्या दिशेने सोडण्यात आलेल्या विषारी वायूच्या प्रभावामुळे या गावात ही समस्या फैलावल्याचे काही जणांचे मानणे आहे.