हायस्पीड बुलेट ट्रेनच्या जाळय़ासाठी चीनला जगभरात ओळखले जाते. आता चनीने ऑटोनोमस ‘स्काय ट्रेन’ तयार करून आणखी एक विक्रम केला आहे. चनीने पहिली ऑटोनोमस ऑल्ट 147 स्काय ट्रेन आणि ऑल्ट 148 तयार केली आहे. ही रेल्वे जमिनीवर नव्हे तर आकाशातून धावणार आहे.
स्काय ट्रेनला अत्यंत नवे तंत्रज्ञान ‘द सस्पेंशन रेल्वे’वर आधारित तयार करण्यात आले आहे. म्हणजेच ही जमिनीवर नव्हे तर आकाशात तयार करण्यात आलेल्या रेल्वेमार्गावर लटकून पुढे जाणार आहे. एकाचवेळी अनेक प्रवाशांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता या स्काय ट्रेनमध्ये आहे.
ही स्काय रेल्वे विशेषकरून छोटय़ा शहरांसाठी तयार करण्यात आले आहे. याचे डिझाइन चिनी लोकांना अत्यंत पसंत पडत आहे. कारण या रेल्वेच्या डब्यांना बऱयाच अंशी जॉयंट पांडाचे स्वरुप देण्यात आले आहे. आकर्षक टॉय लुकमुळे लोकांना स्वतःकडे खेचण्यास ही रेल्वे यशस्वी ठरणार आहे. या रेल्वेतील जागाही प्रशस्त असल्याचे समजते.
ऑटोनोमस ‘स्काय ट्रेन’ तयार करण्यास 2.18 अब्ज युआनचा खर्च आला आहे. ही रेल्वे 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे स्काय ट्रेन असूनही एकावेळी 200 लोकांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोविण्यास ही रेल्वे सक्षम आहे.
न्यू जनरेशनच्या या रेल्वेचे वजन सुमारे 2.5 टन आहे, पारंपरिक रेल्वेंच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध्या टनाने कमी आहे. नव्या स्काय ट्रेनचे परीक्षण चेंगदू शहरात पार पडले आहे. तर चालकरहित तसेच पूर्णपणे बॅटरीवर धावणारी ही रेल्वे आता प्रवाशांच्या सेवेस सज्ज असल्याचे झोंगटांग एअर रेल्वेचे उपमहासंचालक झोंग मिन यांनी म्हटले आहे.