वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे रविवारी झालेल्या बेंगळूर खुल्या एटीपी चॅलेजर्स टेनिस स्पर्धेत चिनी तैपेईच्या चून हेसिन त्सेंगने क्रोएशियाच्या गोझोचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
चीन तैपेईच्या त्सेंगने अंतिम सामन्यात गोझोचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 100 मिनिटे चालला होता. चीन तैपेईच्या सेंगने 2018 साली एटीपीच्या कनिष्ठ पुरूष टेनिसपटूंच्या मानांकन यादीत अग्रस्थान मिळविले होते. सेंगला या जेतेपदाबरोबरच 7200 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस आणि 80 एटीपी गुण मिळाले. उपविजेत्या गोझोला 4240 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस आणि 50 एटीपी गुण मिळाले.
नॉर्वेच्या कास्पर रूडला अजिंक्यपद