ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनने आपल्या एअरलाइन्स कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यामध्ये विमान प्रवासात केबिन क्रूने प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयाचा वापर न करता डिस्पोजेबल डायपरचा वापर करावा, असे म्हटले आहे.
चीनमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तेथील विमानसेवा सुरळीत झाली आहे. मात्र, कोरोना संक्रमणचा धोका असल्याने चीन एअरलाइन्सने कर्मचाऱ्यांसाठी 38 पानी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कर्मचाऱ्यांना कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
वैमानिकांच्या सुरक्षिततेचा धोका लक्षात घेता क्रू कर्मचाऱ्यांना विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. संशियत कोरोनाबाधितांसाठी विमानाच्या मागच्या तीन सीट्स आरक्षित ठेवण्यास तसेच त्या सीट्स पडद्यांच्या मदतीने कव्हर करण्यास सांगितले आहे. तसेच केबिन क्रूने डिस्पोजेबल डायपर, ग्लोव्हज, शूज कव्हर आणि डिस्पोजेबल कॅपचा वापर करण्याची सूचना केली आहे.