प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील संमित्रनगर येथे चोरटय़ाने सदनिपेचा दरवाजा उघडून आतील 3 लाखाचा मुद्देमाल लांबवल़ा ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडल़ी याप्रकरणी सादिक महम्मद होडेकर (53, ऱा संमित्रनगर रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सादिक होडेकर यांच्या संमित्रनगर येथील सदनिकेत चोरटय़ाने दरवाजाचे कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केल़ा यावेळी चोरटय़ाने घरातील 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने व 1 लाख किमतीची रोकड चोरून नेल़ी अशी तक्रार सादिक यांनी दाखल केली आह़े दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले करत आहेत़