सोलापूर प्रतिनिधी
शहर पोलीस दलातील चौदा पोलीस निरीक्षक व चार फौजदारांच्या शहरांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिले आहेत.
पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे – प्रभारी अधिकारी जेलरोड पोलिस ठाणे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), शिवाजी राऊत – प्रभारी अधिकारी जोडभावी पेठ पोलीस ठाणे (जेल रोड), उदयसिंह पाटील – प्रभारी अधिकारी फौजदार चावडी पोलीस ठाणे (सायबर सेल), शिवशंकर बोंदर – प्रभारी अधिकारी एमआयडीसी (आरसीपी), बाळासाहेब भालचिम – सुरक्षा शाखा (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), विजयालक्ष्मी कुरी – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), धनाजी शिंगाडे – अतिक्रमण विभाग (जेलरोड पोलिस ठाणे), राजेंद्र बहिरट – नियंत्रण कक्ष (फौजदार चावडी पोलीस ठाणे), संजय पवार – आरसीपी (एमआयडीसी पोलीस ठाणे), विश्वनाथ सीद – प्रभारी अधिकारी शहर वाहतूक दक्षिण (एमआयडीसी पोलीस ठाणे), राजेंद्र करणकोट – दुय्यम पोलीस निरीक्षक जेलरोड पोलिस ठाणे (फौजदार चावडी पोलीस ठाणे), चंद्रकांत वाबळे – दुय्यम पोलीस निरीक्षक एमआयडीसी (शहर वाहतूक शाखा दक्षिण), सय्यद – सायबर सेल (अतिक्रमण विभाग), संपत पवार – शहर वाहतूक शाखा उत्तर (नियंत्रण कक्ष).
त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास सुनगार – शहर वाहतूक शाखा उत्तर (एमआयडीसी पोलीस ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार – शहर वाहतूक शाखा दक्षिण (नियंत्रण कक्ष), फौजदार श्रीकांत जाधव – शहर वाहतूक शाखा उत्तर (नियंत्रण कक्ष), फौजदार विकास घुगे – शहर वाहतूक शाखा दक्षिण (नियंत्रण कक्ष).बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्त बैजल यांनी दिले आहेत.