राशिवडे/प्रतिनिधी
राशिवडे गावतलावात स्वराज्य फ्रेंडस् सर्कल राशिवडे बुद्रुक यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाच्या बांधकामासाठी भूमिपुत्र संतोष दत्तात्रय गुळवणी यांनी भरीव आर्थिक हातभार लावला आहे. त्यासाठी २५ हजार १२५ रुपयांचा धनादेश गुळवणी व कुटूंबियांनी राशिवडे महोत्सवात पुतळा स्मारक समितीकडे नुकताच सुपूर्त केला.
गुळवणी यांचे पिता दत्तात्रय व मातोश्री जानकी गुळवणी यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीचा हा २५ हजार १२५ रुपयांचा धनादेश संतोष गुळवणी आणि त्यांच्या पत्नी व दोन भगिनींच्या हस्ते पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुहास तोडकर व पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी गुळवणी यांचे एसएससी १९८२ चे वर्गमित्रांची प्रमुख उपस्थिती होती. राशिवडे ग्रामपंचायतीच्या पटांगणावर दोन दिवस घेतलेल्या राशिवडे महोत्सवात जिल्हा परिषद सदस्य राहूल पाटील–सडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गोकुळचे संचालक पी डी धुंदरे, भोगावती साखर कारखान्याचे संचालक कृष्णराव पाटील, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालंदर पाटील, राशिवडे महोत्सवाचे संयोजक व माजी सरपंच सागर धुंदरे, उपसभापती उत्तम पाटील, माजी उपसभापती गजानन बिल्ले, माजी सरपंच बी एन गोंगाणे, बोंद्रेदादा बँकेचे संचालक एकनाथ चौगले, माजी उपसरपंच डॉ. जयसिंग पाटील, ग्रा पं सदस्य अनिल वाडकर आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत व विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.