ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 38 हजार 411 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 9 लाख 45 हजार 097 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
बुधवारी जगभरात 3 लाख 08 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3 लाख बाधितांपैकी 2 कोटी 18 लाख 06 हजार 713 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 72 लाख 86 हजार 601 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 244 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 68 लाख 28 हजार 301 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 41 लाख 19 हजार 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 01 हजार 348 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 51 लाख 18 हजार 253 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 40 लाख 25 हजार 079 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 83 हजार 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.