ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 14 कोटी 05 लाख 58 हजार 460 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 30 लाख 12 हजार 991 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 11 कोटी 94 लाख 57 हजार 550 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 1 कोटी 80 लाख 87 हजार 919 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 1 लाख 06 हजार 795 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 23 लाख 05 हजार 912 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 5 लाख 79 हजार 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. तेथे 1 कोटी 38 लाख 34 हजार 342 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 3 लाख 69 हजार 024 रुग्ण दगावले आहेत.