ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाने आतापर्यंत सहा लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. जगात 1 कोटी 44 लाख 25 हजार 865 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 6 लाख 04 हजार 917 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 86 लाख 12 हजार 194 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 52 लाख 08 हजार 754 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 59 हजार 921 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 38 लाख 33 हजार 271 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृतांची संख्या आहे. ब्राझीलमध्ये 20 लाख 75 हजार 246 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 78 हजार 817 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. इंग्लंडमध्ये 2 लाख 94 हजार 066 रुग्ण आढळले असून, 45 हजार 273 जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोत 3 लाख 38 हजार 913 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 38 हजार 888 जण दगावले आहेत.