शिरगावात कडक पोलीस बंदोबस्त , धोंडगणांकडून आपापल्या ठिकाणी देवीचे नामस्मरण , शिरगावात वर्दळ केवळ पोलिसांचीच, मुख्यमंत्र्यांनी केली निवासस्थानी देवीची पूजा, आणखीन दोन दिवस गाव सील
डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवा दिनी शिरगावात केवळ पोलिसांचीच वर्दळ दिसून आली. शिरगाव गावातील लोकांंनी सुध्दा देवस्थान समितीच्या आवाहनाला मान देत जत्रेच्या दिवशी घरातच राहणे पसंत केले. दिवसभरात मंदिर बंद राहिले. देवीचे कडक सोवळे व्रत पाळणाऱया असंख्य धोंडगणांनी काल मंगळ. दि. 28 रोजी जत्रेच्या दिवशी फराळ ग्रहण करताना देवीचे नामस्मरण करून आपली सेवा रूजू केली.
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन काळात जत्रोत्सव रद्द करण्याची नोटीस जारी करून श्री लईराई देवस्थान समितीने केलेल्या आवाहनाला राज्याभरातील व राज्याबाहेरील देवीच्या असंख्य धोंडगण व भाविक भक्तांनी मान देत आपापल्या घरीच राहणे पसंत केले. काल जत्रेच्या दिवशी दिवसभरात शिरगाव गावात प्रवेश करण्यसाठी कोणी धोंडगण किंवा भाविक आलेच नाही. सध्याची परिस्थिती लोकांनीही समजून घेत आपली जबाबदारी पाळली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घरीच केली देवी लईराईची पुजा
लॉकडाउनमुळे शिरगावात कोणीही येऊ नये असे आवाहन देवस्थान समितीने दिल्याने काल जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावात कोणीही प्रवेश केला नाही. या आवाहनाला मान देताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पदाचा वापर करत शिरगावात जाऊन देवीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न न करता त्यांनी थेट आपल्या निवासस्थानी देवी लईराईची पुजा करून आपली सेवा घरातुनच रूजू केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत पुजा करतानाचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड होताच लोकांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिला. लोकांसाठी असलेल्या कायद्यांचा अंमल स्वतःसाठीही घालून घेण्याचा मुख्यमंत्र्यांनी घातलेला पायंडय़ाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अन्यथा मुख्यमंत्री या राज्यातील कोणत्याही प्रमुख सण उत्सवांना उपस्थिती लावून आपण मुख्यमंत्री म्हणजे कोण उच्च पदस्थ व्यक्ती नसून एक सामान्य लोकांमधीलच सामान्य माणूस असल्याची जाणीव प्रत्येक वेळी गोवेकरांना ते करून देत असतात.
दोन्ही गेटवर कडक बंदोबस्त. निरिक्षक संजय दळवी यांच्याकडून प्रत्यक्ष नजर
शिरगावात अस्नोडा मार्गे व पैरा रेल्वे गेटमार्गे प्रवेश करणाऱया दोन्ही मुख्य मार्गावर गेट घालून पोलीस तैनात करण्यात आले आहे. सदर पोलिसांकडून गावात प्रवेश करू इच्छिणाऱया प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते. तसेच शिरगाव गावातील नागरिकाची सुध्दा पत्ता नमूद असलेले ओळखपत्र तपासूनच त्यांना आत सोडले जाते. तसेच गेटवर नोंदवहीच ठेवण्यात आली असून येणाऱया जाणाऱया प्रत्येकाची नोंद करण्यात येते. डिचोली पोलीस निरिक्षक संजय दळवी हे सध्या शिरगावात ये जा करीत असून ते स्वतः सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.
मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी भैट देऊन केली पाहणी.
डिचोलीचे मामलेदार तथा देवस्थान प्रशासक प्रवीणजय पंडित यांनी काल मंगळ. लि. 28 रोजी दुपारी स्वतः शिरगाव गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत तलाठी अजित गावकर, विजय कवठणकर व इतरांची उपस्थिती होती. मामलेदार पंडित यांनी शिरगावात जाऊन सर्व बंदोबस्त व इतर गोष्टींची पाहणी केली. गावातील लोकांनी जत्रेच्या दिवशीही चांगला प्रतिसाद देताना घरात राहणे पसंत केले आहे. तसेच सर्व मार्ग सील करण्यात आल्याने व लोकांना जत्रोत्सव होणार नसल्याचे आगाऊ सांगितल्याने लोकांनी शिरगावात येण्याचे टाळले आहे. असे मामलेदार पंडित यांनी सांगितले.
शिरगाव आणखीन दोन दिवस सील राहणार ?
मंगळ. दि. 28 एप्रिल रोजी शिरगावात लईराई देवीची जत्रा झाल्यानंतर गावात लागू करण्यात आलेला एक दिवशीय सील आज बुध. दि. 29 रोजी मागे घेऊन गाव खुला करण्यात आला, तर या दोन तीन दिवसांत गावात भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन व 144 या जमावबंदी कलमाचा फज्जा उडणार. त्यासाठी शिरगाव गाव आज आहे त्याचप्रमाणे आणखीन दोन दिवसांसाठी सीलच ठेवण्याचा विचार आहे, अशी माहिती मामलेदार प्रवीणजय पंडित यांंनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
धोंडगणांकडून घराघरात व आपापल्या ठिकाणी देवीचे नामस्मरण.
देवीच्या अगाध श्रध्दा भावनेने आपापल्या घरी, अंगणात सोवळे व्रत पाळणाऱया असंख्य धोंडगणांनी देवस्थान समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देताना आपल्या व्रताच्या जागेवरून बाहेर न पडता व्रत पाळण्यात येणाऱया ठिकाणीच देवीचे नामस्मरण, नाम जप केला. जत्रोत्सवाच्या दिवशी गावागावात घरांमध्ये व अंगणात वास्तव्य करणाऱया धोंडगणांनी केलेल्या नामस्मरणाने गावातील वातावरण भक्तीमय बनले. धोंडगणांबरोबर लोकांनीही देवीच्या नामस्मरणात सहभागी होत आपली सेवा रूजू केली.
शिरगावात जत्रेच्या दिवशी ना भाविक, ना धोंडगण ना गावकरी.. केवळ पोलीस !
शिरगावची जत्रा म्हणजे या राज्यातील एक मोठा उत्सव. या जत्रोत्सवात गोव्याबरोबरच शेजारील राज्यातीलही लोक सहभागी होत असतात. शेजारील महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील गावातील देवीच्या धोंडगणांची संख्याही मोठी आहे. जत्रेच्या दिवशी शिरगावात धोंडगण व भाविकांचा मोठा मेळा पहायला मिळतो. संध्याकाळनंतर तर शिरगाव गाव फुल्ल झालेला असतो. पायाखालची जमिन सुध्दा पाहता येणार नाही, इतकी लोकांची या गावात गर्ली असते. मात्र यावेळी लॉकडाउनमुळे गावात जत्रोत्सवाच्या दिवशी ना भाविक, ना धोंडगण आणि ना गावकरी लोक.. केवळ पोलीस ! अशी परिस्थिती पहायला मिळाली. यावषी जत्रोत्सवात सहभागी होता न आल्याने निराश झालेल्या सर्वांनी है कोरोनाचे संकट लवकरात लवकर दुर होऊन लोकांचे जनजीवन पहिल्यासारखे मार्गी लागू दे, अशी मागणी प्रत्येक धोंडगण व भाविक भक्ताने देवीचरणी केली आहे.