नव्या शोधामुळे 500 वर्षांची गरज पूर्ण होणार
चीनमधील निर्भरता संपुष्टात येणार
जपानची संशोधन नौका काइमनी 8023 मीटर समुद्राच्या खोलीला स्पर्श करण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. ही नौका टेक्टोनिक्स प्लेट आणि मोठे भूकंप होण्याच्या कारणांचा शोध घेत आहे. पण काइमीचे हे संशोधन जपानच्या समुदात 6 किलोमीटर खोलीवर मिळालेल्या दुर्लभ खनिजांना बाहेर काढण्याचे पहिले पाऊल आहे. याच्या माध्यमातून चीनमधील निर्भरता संपविण्याचा जपानचा प्रयत्न आहे.
राजनयिक वादानंतर चीनने दुर्लभ खनिजांची निर्यात रोखली होती. सध्या जपानमध्ये आयात होणाऱया सर्व दुर्लभ धातूंमध्ये चीनची हिस्सेदारी सुमारे 58 टक्के आहे. 2000 साली सागरी बेटांवरून चीन आणि जपानमध्ये वाद झाला होता, तेव्हा चीनने जपानला विकल्या जाणाऱया दुर्लभ खनिजांचा पुरवठा रोखला होता. ही खनिजे नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानासाठी महत्त्वाची आहेत. याचमुळे जपानने नव्या स्रोतांचा शोध सुरू केला होता.
जगाचे नेतृत्व करणार जपान
जपानच्या एजेंसी फॉर मरीन-अर्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांना ओगासावरा बेटाच्या समुद्रतळात दुर्लभ खनिजे आणि येट्रियम मिळाले आहे. हे 16 दशलक्ष टन दुर्लभ ऑक्साइड असून यात 780 वर्षांची देशांतर्गत गरजेइतके येट्रियम, 620 वर्षांच्या गरजेइतके युरोपियम, 420 वर्षे पुरेल इतके टर्बियम आणि 730 वर्षांसाठीच डिस्प्रोसियमचा साठा आहे. हे दुर्लभ धातू तंत्रज्ञान, संरक्षण आणि आण्विक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत.