लोक कशाकशाची चोरी करतील याना नेम नाही अशी स्थिती आहे. जपानमध्ये एका टॉयलेट चोराला नुकतीच अटक करण्यात आली. तो निर्माणाधीन इमारतींमधील टॉयलेट सीट्स् हातोहात लंपास करत असे. त्याच्याकडे अनेक इमारतींमधून चोरलेल्या अशा सीट्स् सापडल्या. स्यूसी तकादा असे या चोराचे नाव आहे. आता त्याच्याकडे पोलिसांनी कुठे कुठे हात मारलास ते सांग असा ‘तगादा’ लावला आहे. तकादा टॉयलेट सीट्स् चोरून त्या एका सेकंड हँड मालाच्या खरेदी विक्री दुकानात विकत असे. तेथे अशीच विक्री करून घरात आराम करत असताना त्याला अटक करण्यात आली. टॉयलेट सीट्स् वर मालकाचे नाव आढळल्याने दुकानदाराने तक्रार केली. त्यावरून हे प्रकरण उजेडात आले.
Previous Articleकॉलर टय़ून आता ‘अमिताभ टय़ून’ नाही
Next Article अमेरिकेत शपथविधीवेळी घातपाताची शक्यता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.