ऑनलाईन टीम / टोकियो :
जपान सरकारने देशातील जन्मदर वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्याला जपान सरकारकडून 6 लाख येन म्हणजेच जवळपास 4.25 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार आहेत.
जपानमध्ये जन्मदराच्या तुलनेत मृत्युदर जास्त असल्याने तेथील सरकार चिंतेत आहे. जपानची लोकसंख्या 12 कोटी 68 लाख आहे. मागील वर्षी 8 लाख 65 हजार मुलांनी जन्म घेतला. तर मृत्यू झालेल्यांची संख्या त्यापेक्षा 5 लाख 12 हजारांनी जास्त होती. त्यामुळे जनसंख्या वाढीचा समतोल राखण्यासाठी जपान सरकारने ही नवी योजना आणली आहे.
जपानमध्ये वयोवृध्द लोकांची संख्या अधिक आहे. युवकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे काही अटींसह ही योजना सुरू करण्यात आली आहे. लग्न करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असून नये. तसेच ज्या जोडप्याचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असेल, त्यांचे उत्पन्न 33 लाखांहून अधिक नसावे, असे जपान सरकारने म्हटले आहे.