ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :
जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
या भूकंपाचे केंद्र भारत पाकिस्तानची सीमा आहे, असे समोर आले आहे. भूकंप दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी झाला. हा भूकंप जमिनीखाली 10 किलो मीटर खोल अंतरावर झाला.