ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. आज दिवसभरात 525 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 38 हजार 223 वर पोहोचली आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2020/09/Screenshot_20200901-1840312.png)
मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 241 आणि काश्मीर मधील 284 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 8 हजार 022 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 2318 आणि काश्मीरमधील 5704 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 29 हजार 484 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 6634 रुग्ण जम्मूतील तर 22850 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 717 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 70 जण तर काश्मीरमधील 647 जणांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 4 लाख 64 हजार 313 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 45 हजार 845 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 8 हजार 022 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.