ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 77 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 191 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 17 आणि काश्मीर मधील 60 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 859 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 87 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,24,367 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 51,226 रुग्ण जम्मूतील तर 73,141 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 729 जण तर काश्मीरमधील 1236 जणांनी आपला जीव गमावला आहे.