ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 617 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 00 हजार 968 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 226 आणि काश्मीर मधील 391 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 578 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 511 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 93,824 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 37960 रुग्ण जम्मूतील तर 55,864 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1566 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 527 जण तर काश्मीरमधील 1039 जणांनी आपला जीव गमावला आहे.