5 पोलीस कर्मचाऱयांना नोटीस
उत्तरप्रदेशचा प्रत्येक व्यक्ती सध्या निवडणुकीच्या रंगात रंगून गेला आहे. परंतु शासकीय सेवेत असतानाही नेत्याचे समर्थन केल्याने काही जण अडचणीत येत आहेत. रामपूर जिल्हय़ात राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या बाजूने घोषणा देणाऱया 6 पोलीस कर्मचाऱयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
रामपूर जिल्हा कारागृहाशी संबंधित ही घटना आहे. एका व्हायरल चित्रफितीत जिल्हा कारागृहात तैनात 6 पोलीस कर्मचारी देशभक्तीच्या गाण्यांवर नाचण्यासह जयंत चौधरी जिंदाबाद अशा घोषणा देताना दिसून येतात. या पोलीस कर्मचाऱयांना नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणी चौकशी केली जात आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणी पोलीस कर्मचाऱयांकडून स्पष्टीकरण आहे. चित्रफित काही दिवसांची असून प्रजासत्ताक दिनी प्रशस्ती पत्र मिळविणाऱया जयंत चौधरी नावाच्या मित्राचा जयजयकार करत होतो. यात रालोद प्रमुख जयंत चौधरी संबंधी नारा देण्यात आला नव्हता असा दावा त्यांनी केला आहे. व्हायरल चित्रफितीसंबंध्घ पोलीस कर्मचाऱयांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल. यासंबंधी पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) यांना अहवाल पाठविला जाणार असल्याचे तुरुंग अधीक्षक प्रशांत मौर्य यांनी सांगितले आहे.