थलाइवी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मागील काही काळापासून कंगना रनौतचा चित्रपट ‘थलाइवी’ अत्यंत चर्चेत आहे. 23 मार्च रोजी कंगनाच्या 34 व्या जन्मदिनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा बायोपिक असून कंगना यात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. कंगनासाब्sात तमिळ सुपरस्टार अरविंद स्वामी हे एमजीआर यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येतील.
या चित्रपटात जयललितांची अभिनयातील कारकीर्द तसेच राजकीय संघर्ष दाखविण्यात येणार आहे. जयललितांनी कशाप्रकारे एक महिला म्हणून संघर्ष करत राजकारणात तळापासून शिखरापर्यंत प्रवास पूर्ण केला हे यात दिसून येईल. ट्रेलरमध्ये जयललिता यांची एमजीआर यांच्याशी असलेली जवळीक, राजकारणातील प्रवेश आणि नंतर संघर्ष करत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळतो.
चित्रपटात काय विशेष
चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत जयललितांच्या चित्रपट कारकीर्दीवर अधिक भर देण्यात आला आहे. एक अभिनेत्री म्हणून कंगना आणि एमजीआरच्या गेटअपमध्ये अरविंद स्वामी अत्यंत उत्तम दिसून येत आहेत. चित्रपटातील संवाद प्रभावी असल्याचे समजते. थलाइवीचे दिग्दर्शन विजय यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे. 23 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.