ऑनलाईन टीम / बर्लिन :
कोरोनाच्या फैलावाला चीन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत जर्मनीने देशात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे 130 अब्ज युरोचे बिल चीनला पाठविले आहे. जर्मनीच्या या हालचालीने चीनला मोठा धक्का बसला आहे.
जर्मनीतील बिल्ड या प्रतिष्ठित वृत्तपत्राने कोरोनामुळे देशात झालेल्या नुकसानीचे संपूर्ण बिल प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, जर्मनीने प्रत्येक व्यक्तीमागे 1784 युरो तोटा गृहीत धरला आहे. देशाचा जीडीपी देखील कमी झाला आहे. जर्मनीच्या या हल्ल्याला चिडलेल्या चीनने राष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी परदेशी लोकांचा द्वेष दाखविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, अमेरिकेनेही या संक्रमणाचे परिणाम चीनला भोगावे लागतील, असे खुलेपणाने सांगितले आहे.