प्रतिनिधी /येळ्ळूर
सभासद, ठेवीदार, संचालक मंडळ, कर्मचारी आणि येळ्ळूरच्या समस्त जनतेच्या विश्वासावरच सैनिक मल्टिपर्पज सोसायटीने मोठी झेप घेतली आहे. केवळ अर्थकारणच नाही तर सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावासाठी कमी दरामध्ये सैनिक भवन, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगारास मदत केली आहे. हे केवळ एकजुटीमुळे झाले आहे, असे येळ्ळूर सैनिक मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन बाबुराव मुरकुटे यांनी सांगितले.
सैनिक मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सैनिक भवन कार्यालयामध्ये झाली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी चेअरमन बाबुराव मुरकुटे यांनी सोसायटी आणि तिच्या कार्याबाबत आढावा घेतला. प्रास्ताविक व्हा. चेअरमन परशराम घाडी यांनी केले. तुकाराम जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. अभियंते हणमंत कुगजी, अप्पुराव पाटील, शांताराम जाधव, गजानन पाटील, महादेव जाधव, अरुण पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सोसायटीने 18 कोटी 50 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल केली आहे. संस्थेकडे 17 कोटीच्या ठेवी, 5 कोटी 40 लाखाची गुंतवणूक आणि 12 कोटीचे कर्ज वितरित केले आहे, अशी माहिती सोसायटीचे सेपेटरी यल्लाप्पा बिर्जे यांनी दिली. चेअरमन बाबुराव मुरकुटे यांना पुरस्कार मिळाला होता. त्याबद्दल त्यांचा आणि त्यांची पत्नी मंगल मुरकुटे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी सैनिक भवनचे अध्यक्ष पी. पी. पाटील यांनी आपले विचार क्यक्त केले.
सैनिक महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता गिंडे, संचालक मोनाप्पा पाटील, बळीराम पाटील, पांडुरंग जाधव, गजानन पोटे, गोपाळ हुंदरे, महादेव पुन्याण्णावर, भरमाजी गिंडे, अनंत पाटील, शिवाजी खामकर, परशराम कदम, संचालिका रेखा मुरकुटे, कमल पोटे तसेच महिला मंडळ, सभासद, सल्लागार, कर्मचारी उपस्थित होते. प्रशांत भातकांडे यांनी आभार मानले.