दुसऱया तिमाहीमधील जागतिक पातळीवर आकडेवारीचा समावेश
वृत्तसंस्था/ लंडन
मागील काही महिन्यांपासून जागतिक पातळीवरुन कॉम्प्युटरची मागणी वाढत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. 2020 च्या दुसऱया तिमाहीमध्येही वेगाने विक्री वधारत गेली आहे. या कालावधीत जागतिक पातळीवरील पीसी शिपमेंटमध्ये 11.2 टक्क्मयांनी वाढ झाली असल्याची माहिती आयडीसीच्या नवीन अहवालामधून समोर आली आहे.
महामारीच्या कारणामुळे बहूतांश नागरिक वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडून घरातूनच काम करण्यावर भर देत असल्यानेच कॉम्प्युटर्सच्या मागणीत वाढ झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. या प्राथमिकतेमुळे नवीन टेंडस्च्या लॅपटॉप आणि पीसीची मागणी वेगाने वाढत गेली आहे.
आयडीसीच्या माहितीनुसार सदर कालावधीच्या दरम्यान 7.23 कोटी युनिट्सची विक्री केली होती. यामध्ये लॅपटॉप, वर्कस्टेशन आणि डेस्कटॉपचा समावेश होतो. विशेष बाब म्हणजे युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका तसेच संयुक्त राज्य अमेरिका येथेही वेगाने विक्री वाढत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर भारतात विक्रीच्या आकडय़ामध्ये चालू वर्षात तिसऱया तिमाहीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सर्वात तेजीत
सेगमेंटध्ये लिडिंग ब्रँडमध्ये एचपी यांची हिस्सेदारी बाजारात 25 टक्क्मयांच्या समभागासोबत टॉपवर राहिली आहे, असे आयडीसीच्या अहवालामधून सांगितले आहे. लीनेवोचा हिस्सा 24.1 टक्क्मयावर राहिला आहे आणि डेलने 16.1 टक्क्मयांसोबतच्या हिस्सेदारीसह पहिल्या तीनमध्ये स्थान निर्माण केले आहे.
भारतीयांची पसंती
मोबाईलच्या तुलनेत भारत पीसीच्या मागणीत अन्य देशांच्या तुलनेत खूप पाठीमागे आहे. यात खरेदीदार सर्वात जादा 40 हजारपेक्षा कमी गटातील पीसींना अधिक मागणी करतात, असे दिसते. नवीन ब्रँड आणि टेक्नॉलॉजीवर आधारीत पीसी घेण्याकडे अनेकांचा कल आहे.