वर्ल्ड इंटेलेक्मचुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनची माहिती: चीन अग्रस्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना कालावधीतील आर्थिक गतीचा वेग मंदीत असल्याच्या कारणामुळे केंद्राने आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱया देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशामध्ये नवनवीन उत्पादने तयार करून जगातील बाजारपेठेत स्पर्धा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
भारताची आर्थिकपातळीवर नेतृत्व करण्यासाठी चीनसोबत अन्य देशांशी तुलना केली जात आहे. यामध्येच पेटंट फाईलिंग करण्याच्या स्पर्धेत भारत चीनच्या कितीतरी मागे असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच अन्य देशही या स्पर्धेत असल्याची नोंद आहे.
वर्ष 2019 मध्ये देशभरात पेटंटची एकूण संख्या 2,65,800 इतकी असून यामध्ये भारताने एकूण 2053 इतके प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती वर्ल्ड इंटेलेक्मचुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन यांच्याकडून (डब्लूआयपीओ) देण्यात आली आहे.
भारत संपूर्ण जगभरात पेटंट प्रस्ताव दाखल करण्यात 14 व्या स्थानी आहे. उपलब्ध माहितीनुसार 2019 मध्ये पेटंटसाठी सर्वाधिक 58,900 इतके प्रस्ताव चीनकडून सादर करण्यात आले आहेत. यामुळे भारत चीनपेक्षा 97 टक्क्मयांनी मागे राहिल्याची नोंद केली आहे.
2019 मध्ये पेटंटसाठी प्रस्ताव
दाखल करणाऱया कंपन्या
कंपनी प्रस्ताव
हुआई…………… 4411
मित्सुबिशी इलेक्ट्रिक 2661
सॅमसंग………… 2334
क्वालकॉम………. 2127
ओप्पो मोबाईल. 1927
2019 मध्ये पेटंट फाईल
करणारे पहिले पाच देश
1. चीन…….. 58,990
2. अमेरिका… 57,840
3. जपान…… 52,660
4. जर्मनी…… 19,353
5. द.कोरिया. 19,085
14.भारत…….. 2,053