मावस सासूचे दागिने चोरण्यासाठीच केला प्लॅन
प्रतिनिधी/ सातारा
खटाव तालुक्यातील विसापूर येथील हणंमत भाऊ निकम (वय 58), कमल हणमंत निकम (वय 65) यांचा उशीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दि. 9 रोजी रात्री घडला होता. ते दोन्ही खून कमल यांच्या बहिणीचा जावई सतीश शेवाळे (रा. शनिवार पेठ सातारा) व त्याचा साथीदार सखाराम मदने (रा. पार्ले, ता. कराड) यांनी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य संशयित आरोपी सतीश शेवाळे हा कर्जबाजारी होता. नोकरीही गेली होती. त्यातून आलेल्या नैराशेतून सुटका मिळवण्यासाठी त्याने मावस सासूöसासऱयालाच संपवले. त्यांच्याकडेच दागिने घेऊन दोघांनी तेथून पळ काढला. त्याने सोने कुठे विकले, याचा शोध आम्ही घेत आहोत असेही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेवेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, पोलीस उपअधीक्षक केंद्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह पोलीस पथक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसापुर येथे दि. 9 रोजी रात्री बिकट घटना घडली होती. तेथील वृद्ध दाम्पत्य हणमंत निकम यांचा एका खोलीत तर कमल निकम यांचा दुसऱया खोलीत मृतदेह आढळून आला होता. मी घटनास्थळी रात्रीच भेट दिली. खूप मेहनत घेऊन आमच्या पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सतीश शेवाळे हा खून झालेल्या दाम्पत्याचा नातेवाईक आहे. त्यानेच कट रचला असल्याची पोलिसांकडे त्याने कबुली दिली आहे. दि. 8 रोजी सतीश शेवाळे व त्याचा जोडीदार सखाराम मदने हे दोघे निकम यांच्याकडे गेले होते. दोघांनी निकम दाम्पत्य जेवण करेपर्यंत त्यांच्याशी बोलत बसले. जेवणानंतर हणंमत निकम हे वेगळय़ा खोलीत तर कमल निकम या वेगळय़ा खोलीत झोपण्यासाठी गेल्या. त्याचवेळी सतीश व सखाराम यांनी हणमंत निकम यांच्याकडे विचारणा करण्याच्या निमित्ताने गेले अन् दोघांनी त्यांचा उशीने तोंड दाबून गळा आवळून खून केला. त्यानंतर त्या दोघांनी बाजूच्याच खोलीत झोपलेल्या कमल यांच्याकडे त्या दोघांनी मोर्चा वळवला. त्यांचाही उशीने तोंड दाबून खून केला. त्यांच्या अंगावर असलेले मंगळसुत्र सोडून सहा तोळे दागिने काढून घेतले अन् दोघांनी तेथून कराड गाठले.
पोलिसांना ही माहिती मिळताच तेथे पोहचले. घटनास्थळाची सगळी माहिती घेतली. मी तशा सक्त सूचना पथकाला दिल्या होत्या. पथकाने सर्व बाजूने चौकशी केली. सतीश शेवाळे यालाही दोन वेळा चौकशीकरता बोलवण्यात आले होते. त्याने वेगळीच माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, तांत्रिक बाबीच्या आधारे सतीश शेवाळे याच्याकडे संशयाची सुई वळल्याने त्याची माहिती घेतली असता तो दि. 26 रोजी एका शिक्षण संस्थेच्या परिसरात दुपारी तो एकटाच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडताच सतीश शेवाळे याने ढसाढसा अश्रू काढले अन् गुह्याची कबुली दिली.
मावस सासूच्या गळयातील सोन्यामुळे खुनाचा कट शिजला
सतीश शेवाळे या सातारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत नोकरी करत होता. कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यातच काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले होते. कर्ज कसे फेडायचे या विचाराने दिवसेंदिवस तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने त्याची मावस सासू कमल निकम हिच्याकडे जास्त सोने असल्याने तिचा खून करुन ते सोने विकून आपले कर्ज भागवण्याचा कट आखला. परंतु खून केल्यानंतर पोलिसांनी दोन वेळा चौकशीला बोलवल्यावर त्याच्यावर पोलिसांचे नजर असल्याने आपले बिंग फुटल्याची बाब त्याच्या मनात घोळु लागल्याने त्याने पुन्हा आत्महत्या करुन काढलेल्या विमा पॉलिसीतून किमान कुटुंबियांना तरी फायदा होईल या उद्देशाने तो आत्महत्या करण्यासाठी गेला होता. आत्महत्या करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यास पकडले.
सोने कुठे विकले याचीही होणार चौकशी
खून केल्यानंतर सतीश शेवाळे व त्याच्या जोडीदाराने सोने नेऊन कुठे विकले.. कुठे ठेवले याचा शोध सुरु आहे. त्यांच्या या कटात आणखी कोण होते काय याचाही पोलीस शोध घेत आहेत, असेही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
क्राईम रेट कमी आलेला आहे
सातारा जिह्यात क्राईम रेट कमी आलेला आहे. तोफखाना येथील खूनाचा तपास सुरु आहे. तो काही दिवसात उघड होईल. कराड येथील एटीएम जिलेटीनच्या स्फोटाने फोडल्याची घटना गंभीर होती. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. कोरेगाव येथील जो व्यक्ती रस्त्याने हातात शस्त्र घेवून फिरत होता. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे होते. विज कंपनीच्या ठेकेदारावर गुह्याचा तपास सुरु आहे, अशी उत्तरे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली असून 112 नंबरमुळे पोलीस घटनास्थळी लगेच पोहचतात. त्यामुळे बहुतांशी घटना टळतात, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाचे केले कौतुक
हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, संतोष सपकाळ, पोलीस नाईक अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी ससे, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, पो. कॉ. मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत यांनी कारवाई केली. यांच्यासोबत साबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक एस.एस.शेळके, पो. कॉ. यशवंत घाडगे, सुशांत कदम यांनी गुह्याच्या अनुषंगाने सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.