नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने दमदार इंजिनसह आपली नवी ग्लॅमर एक्सटेक दुचाकी आधुनिक वैशिष्टय़ासह बाजारात दाखल केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी आधीच्या तुलनेत जास्तीचे मायलेज देणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यातील ड्रम ब्रेक प्रकारातील गाडीची किंमत 78 हजार 900 रुपये आणि डिस्क बेक प्रकारातील गाडीची किंमत 83 हजार 500 रुपये इतकी असणार आहे. गाडीला 125 सीसीचे इंजिन असून आधीच्या मॉडेलपेक्षा सदरची नवी गाडी ही 7 टक्के इतके जास्तीचे मायलेज देणार आहे. प्रति लिटरला ही गाडी 70 किमीचे अंतर कापू शकेल असा दावा कंपनीने केला आहे. ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हीगेशन सिस्टीम, इंटिग्रेटेड युएसबी चार्जिंग, कॉल व एसएमएस ऍलर्ट व गुगल मॅप कनेक्टिव्हिटी सारख्या सुविध या गाडीत असणार आहेत. याला एलईडी हेडलॅम्प असून इतर गाडय़ांच्या तुलनेत 34 टक्के अधिक प्रकाशझोत गाडीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यात इको मोड, टेकोमीटर व रियल टाइम मायलेज इंडिकेटरची सुविधाही आहे.