बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांना प्रत्येकी २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.
मंत्री म्हणाले की, राज्यात नुकतेच ८०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आले असून अधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण केले जाईल. विशेषत: हसन, मंड्या, चिकबळ्ळापूर , कोलार, चित्रदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये या सुविधांचा अभाव असल्याचे ते म्हणाले.
आम्ही राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आयसीयू सुविधा, ऑक्सिजन इत्यादीच्या अधिक मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत. मी आज तुमकूर आणि चित्रदुर्गाला भेट देत आहे . तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या आठवड्यात दावणगिरी, हवेरी, हुबळी आणि गदग मेडिकल कॉलेजांनाही भेट देणार असल्याचे मंत्री म्हणाले.