5,655.75 कोटीच्या गुंतवणुकीचे संकेत : सिल्वरची हिस्सेदारी 1.15 होणार
मुंबई :
नुकताच झालेला फेसबुक आणि जिओ यांच्यामधील व्यवहाराची बातमी ताजी असताना. आता त्याच प्रकारचा नवीन व्यवहार रिलायन्सने केला आहे. यामध्ये अमेरिकन कंपनी सिल्वर लेक आता रिलायन्स जिओ प्लॅटफार्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जिओ प्लॅटफार्मच्या इक्विटी मूल्याच्या 4.90 लाख कोटी रुपये आणि एटरप्राईजेस मूल्य 5.15 लाख कोटु रुपयावर करण्यात येणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने चौथ्या तिमाहीतीचा अहवाल सादर करण्याच्या अगोदरच झालेल्या 30 एप्रिलच्या कंपनीच्या बैठकीत जिओ प्लॅटफार्मची जवळपास 10 टक्के हिस्सेदारी विकण्यावर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये रिलायन्सने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार जिओमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठीची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे. तर यातील काही गुंतवणूकदार येत्या काही महिन्यांमध्ये आपली गुंतवणूक जिओमध्ये करण्याचे संकेत दिले आहेत. या घोषणेच्या पाच दिवसांमध्येच सिल्वर लेक या कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.
या अगोदर फेसबुकची हातमिळवणी
मागील महिन्यात प्रसिद्ध सोशल नेटवर्कीग कंपनी फेसबुकने जिओमध्ये 43,574 कोटी रुपयाची गंतवणूक केली आहे. यातून जिओमध्ये फेसबुकची हिस्सेदारी 9.99 टक्के इतकी राहणार आहे. हा व्यवहार भारतामधील टेक कंपन्यामधील सर्वात मोठा व्यवहार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत
मागील वर्षात ऑगस्टमध्ये रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मार्च 2021 पर्यंत कंपनीला कर्जमुक्त बनविण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते. त्याच मार्गाने सध्याचे निर्णय होत असल्याचेही यावेळी कंपनीने सांगितले आहे.