प्रतिनिधी/ बेळगाव
जितो लेडिज विंग बेळगावतर्फे ‘दिवाळी मिलन’ हा स्नेहमेळावा महावीर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला. मागील 6 ते 7 महिने व्हर्च्युअल कार्यक्रम करण्यात येत होते. परंतु आता सभासद महिलांसाठी आरतीची थाळी मसाल्याच्या पदार्थांनी सजविणे व गिफ्ट रॅपिंग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शिलप्रभा पुनजगौडा, ममता जैन, प्राची कब्बूर, सरिता मोहिरे विजयी ठरल्या.
लेडीज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वर्षभर होणाऱया कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यानंतर महिलांसाठी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मानसी कलंत्री यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सेपेटरी शिल्पा हजारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन लता परमार यांनी केले. कार्यक्रमासाठी लता परमार व मिनल शहा यांनी परिश्रम घेतले.