चिक्कबळ्ळापूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील हिरेनागावळ्ळी गावात उत्खननस्थळी झालेल्या स्फोटात कमीतकमी सहा लोक ठार झाले. मंगळवारी पहाटे या जिलेटिनच्या कांड्यांच्या स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार जिलेटिनच्या कांड्या वाहनातून जात असताना हा स्फोट झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान पेरेसंद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान ते सर्वजण उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. याआधी शिवमोगा येथे २२ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटात कमीतकमी आठहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला होता.