प्रतिनिधी/कडेगाव
सांगली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व सागरेश्वर सहकारी सूत गिरणी माजी चेअरमन भिमराव मोहिते (नाना) यांच्या सुविध पत्नी स्व.कमल भिमराव मोहिते (नानी) वय ६० यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गावात त्या नानी या नावाने परीचित होत्या. गावातील पारायण व इतर सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता.
काँग्रेसचे जेष्ठ नेते भिमराव मोहिते यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांची मोठी साथ होती. तसेच शेतीवर देखिल त्यांचे मोठे प्रेम होते.शेतीवर देखिल देखरेख करून द्राक्षे,केळी, आले पिकांच्या शेतीची माहिती होती. गावागाडयातील गोरगरीब व बाराबलुतेदार यांना त्यांची कायमच मोलाची मदत असायची त्यांना मदतीचा हात त्यांनी कायम दिला. त्यांच्या पश्चात मुलगा माजी सरपंच विक्रम मोहिते, सुनबाई सरपंच आश्विनी मोहिते, दोन मुली, दिर, भावजयी, पुतणे, पुतण्या असा मोठा परीवार आहे. रक्षाविर्सजन गुरूवारी सकाळी ९ वाजता सोहोली येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे सकाळी ९ वाजता होणार आहे.