प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 24 तासात बेळगाव जिह्यातील 1235 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 26 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्याप 201 सक्रिय रुग्ण आहेत.
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 16 जणांपैकी 10 जण बेळगाव शहर व तालुक्मयातील आहेत, तर उर्वरित 6 जण जिह्यातील वेगवेगळय़ा भागातील आहेत. मण्णूर, खासबाग, टिळकवाडी, कचेरी गल्ली, अशोकनगर, रामतीर्थनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एका शिवबसवनगर परिसरात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जोडकुरळी, संकेश्वर, बेनचिनमर्डी, अथणी, रामदुर्ग येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 307 इतकी झाली आहे. त्यापैकी 26 हजार 762 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप 201 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
30 हजार 911 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. अद्याप 2 हजार 426 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 5 लाख 74 हजारहून अधिक जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 41 हजार 185 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे 344 जण दगावले आहेत.