8 नवे रुग्ण, बेळगाव तालुक्यातील वृद्धेचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी जिल्हय़ातील 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी बहुतेक जण घरीच उपचार घेऊन बरे झाले आहेत तर गेल्या 24 तासांत आठ नवे रुग्ण आढळून आले असून बेळगाव तालुक्मयातील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 766 वर पोहोचली असून आतापर्यंत 78 हजार 690 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 114 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी बहुतेक जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 932 इतका झाला आहे.
अद्याप जिल्हय़ातील 3 हजार 96 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. गेल्या 24 तासांत 326 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शुक्रवारी अथणी, बेळगाव, चिकोडी, गोकाक तालुक्मयात प्रत्येकी 1, सौंदत्ती व हुक्केरीत प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले आहेत. बैलहोंगल, खानापूर, रामदुर्ग, रायबाग तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही.