आतापर्यंत 117 जणांना डिस्चार्ज : कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 38
प्रतिनिधी / ओरोस:
शनिवारी जिल्हय़ातील आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 117 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 38 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात आतापर्यंत 160 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 117 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 38 सक्रिय रुग्ण आहेत.
कुडाळ तालुक्मयातील पिंगुळी येथे कंटेनमेंट झोन
कुडाळ तालुक्मयातील पिंगुळी येथील गोंधळपूर, मुस्लीमवाडी हे केंद्रबिंदू मानून, पिंगुळी-गोंधळपूर, मुस्लीमवाडीचा 500 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 3 जुलैपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 03159
अहवाल प्राप्त झालेले नमुने 03118
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00160
निगेटिव्ह आलेले नमुने 02958
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00041
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 00038
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 00001
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 00117
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 00004
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 00054
शनिवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 04249
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 14143
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 00070
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12038
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 02035
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 103662