प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी जिल्हय़ात 267 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर एका दिवसात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव तालुक्मयात दिवसभरात 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामधील ग्रामीण भागातील 19 जणांचा तर शहरी भागातील 75 जणांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार 181 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत बेळगाव जिल्हय़ातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 546 इतकी झाली आहे. यापैकी 6 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 4 हजार 244 जण सध्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
राज्यभरात सर्वच ठिकाणी तपासणी कार्य जोरात सुरू आहे. आजवर 1 लाख 79 हजार 316 जणांची विमानतळांवरच स्वॅब तपासणी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या 3 लाख 65 हजार 664 तर अप्रत्यक्षरित्या संपर्कात आलेल्या 3 लाख 85 हजार 105 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 82 हजार 688 जणांची तपासणी
राज्यात 3 लाख 53 हजार 17 रुग्ण गृहविलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव जिल्हय़ात आतापर्यंत 82 हजार 688 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 67 हजार 658 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या लॉकडाऊन नसले तरी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी म्हणून लॉकडाऊनचे नियम पाळावेत, असे आवाहन सामाजिक संघटना आणि प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करा तसेच मास्कचा कटाक्षाने वापर करा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास सरकारी इस्पितळ किंवा 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून योग्यवेळी योग्य उपचार घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक वास्तुंमध्ये मोठय़ा संख्येने जमणे पूर्णपणे टाळावे, काळजी घेण्याची हीच खरी वेळ आहे, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.