पशुसंगोपन खात्यातर्पे पहिल्या टप्प्याला सुरुवात : 1 लाख 10 हजार डोस उपलब्ध, मादी जातीच्या वासरांना लस टोचून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
ब्रुसेलोसिस या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्याच्यावतीने प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. सोमवारी बेळगाव तालुक्मयातील काही गावांतून मादी जातीच्या वासरांना लस देण्यात आली. बुसेलोसिस हा संसर्गजन्य रोग असून त्यांची जनावरांना लागण झाल्यास त्याचा मानवाला धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्यामार्फत पहिल्या टप्प्यात बुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या रोगाचा धोका टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या 4 ते 8 वयोगटातील मादी जातीच्या वासरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
सांसर्गिक पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास मानवालाही बुसेलोसिस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी खबरदारी म्हणून खात्यामार्फत चार ते आठ महिन्यांच्या गायी-म्हशींच्या मादी जातीच्या वासरांना ही प्रतिबंधक लस दिली जात आहे. संबंधित पशुपालकांनी आपल्या मादी जातीच्या वासरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही लसीकरण मोहीम घरोघरी राबविली जात आहे. संक्रमित झालेल्या प्राण्यांशी जवळून संपर्क आल्यास पशुपालकांनादेखील याचा धोका पोहचू शकतो. दरम्यान पाळीव जनावरांना ब्रुसेलोसिसची लागण झाल्यास गर्भपात होतो. याकरिता लहान वयातच वासरांना ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे.
खात्यामार्फत 1 लाख 10 हजार प्रतिबंधक डोस उपलब्ध झाले असून पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील 29 हजार मादी जातीच्या वासरांना लस दिली जाणार आहे. दरम्यान जिल्हय़ातील पशुवैद्यकीय डॉक्टरांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय डोळय़ावर गॉगल, फेस शिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझर वापरण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.