प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हय़ातील सर्व नागरी क्षेत्रामध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन नवीन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 12 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. सहा रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 236 व्यक्तींना होम क्वारन्टाईन करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.
नगरी भागात दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामधून अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना सूट देण्यात आली आहे. त्यांनी स्वतःजवळ त्यांचे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रामध्ये नागरिकांना घरपोच सेवा पुरवण्याच्या दृष्टीने नगर प्रशासनाने तयारी करावी. अशा प्रकारे घरपोच सेवा देणारे स्वयंसेवक, व्यापारी व वाहतूकदारांच्या कामगारांना नगर प्रशासनाने ओळखपत्रे द्यावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.
परराज्यातील लोक, मजुरांसाठीबारा ठिकाणी कॅम्प
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अडकलेल्या परराज्यातील लोकांसाठी तसेच मजूर, बेघर यांच्यासाठी जिल्हय़ात बारा कॅम्प उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्मयात चार ठिकाणी, तर मालवण – पाच आणि कुडाळ – तीन असे एकूण 12 ठिकाणी कॅम्प स्थापन करण्यात आले आहेत. तेथे परराज्यातील व जिल्हय़ातील आजमितीस एकूण 502 व्यक्ती असून त्यांची निवारा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व लोकांना जेवणाची सुविधा मिळावी, यासाठी तालुकास्तरावर शिवभोजन केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित तालुक्मयातील तहसीलदार हे या विषयीचे नोडल ऑफिसर आहेत. मजूर व गरजूंच्या कॅम्पना मदत करायची असेल तसेच ज्ये÷ नागरिक, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, अनाथालय, वसतिगृह यांना मदत हवी असेल, तर त्यांनी विक्रम बहुरे (9518950903) किंवा अशोक पोळ (9766144041) यांच्याशी संपर्क साधावा.
कोरोना विषाणूसंदर्भात करण्यात आलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. कोविड-19 कक्षामध्ये बेड्स व सुविधा कशा वाढवता येतील, याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक व डॉक्टर यांच्याशी चर्चा केली.
सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी परवाने देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने ऍप तयार केले असून या माध्यमातून वाहतुकीचे सर्व प्रकारचे परवाने देण्यात येणार आहेत. नागरिक घरबसल्या covid19.mhpolice.in या लिंकवर हे ऍप डाऊनलोड करून अत्यावश्यक प्रवासासाठीचे परवाने घेऊ शकणार आहेत.
जिल्हय़ातील अत्यावश्यक दळणवळणाच्या सुविधांची जसे रस्ते यांची कामे थांबवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
होम क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी 188 गुन्हे दाखल
जिल्हय़ात होम क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी एकूण 188 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच ते कोणत्याही प्रकारे प्रवास करू शकत नाहीत. गर्दीमध्ये मिसळू शकत नाहीत. अशा नियमांचे पालन न केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये 12 रुग्ण दाखल असून मंगळवारी नव्याने दोन रुग्ण दाखल झाले आहेत. एकूण 40 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 34 नमुन्यांचे अहवाल प्राप्त आहेत. अजून सहा नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षामधील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. एकूण 236 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 56 व्यक्ती इन्स्टिस्टुशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य संस्थांमार्फत एकूण 2638 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर सर्व पोलीस नाक्मयांवर 387 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा असलेला धोका कमी झालेला नसून नागरिकांनी खबरदारी बाळगावी व जबाबदारीने वागावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य सर्वेक्षणासाठी लिंक
जिल्हय़ात सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. ही तपासणी अधिक गतीने व्हावी व नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने https://sossindhudurg.in ही लिंक तयार केली असून त्यामध्ये नागरिकांनी स्वतःची संपूर्ण माहिती स्वतःहून भरायची आहे. तसेच एखाद्या डॉक्टरना पेशंटसंबंधी काही माहिती द्यायची असेल, तर तीही या लिंकच्या माध्यमातून देता येणार आहे. त्यासाठी ‘क्मयू. आर.’ कोडची सुविधाही उपलब्ध आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिक त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यासह आरोग्याची माहिती भरू शकणार आहेत. आरोग्याच्या माहितीमध्ये त्यांना ताप, खोकला, सर्दी असे काही आहे का?, तसेच इतर काही आजार जसे मधुमेह, हायपरटेन्शन आहे का? याची संपूर्ण माहिती देता येणार आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणे सोपे जाणार आहे.