तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा – जिह्यात बेडची टंचाई,
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा रुग्णालयाबरोबर, महिला रुग्णालयातही ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी 90 लाख रुगये मंजूर झाले आहेत. कामथे, कळंबणी, राजापूर, दापोली शहरातही ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन असून बेडदेखील वाढविण्यात येणार आहेत. आणखीन 10 व्हॅन्टिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत. सध्या जिह्यात 28 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असून तो पुढील दोन ते तीन दिवस पुरेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध व संभाव्य तिसऱया लाटेला थोपविण्याच्या पार्श्वभुमीवर सोमवारी जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आणि आरोग्य विभागासह इतर खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.
कामथे, कळंबणी, राजापूर, दापोलीतही ऑक्सिजन प्लँट
कामथे, कळंबणी, राजापूर शहर, दापोली शहरात ऑक्सिजने प्लॅन्ट उभारले जाणार आहेत. जिह्यात येणाऱया प्रत्येकाची कोरोना चाचणी व्हावी, यासाठी तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. जिह्याचा मृत्यूदर कसा कमी होईल, यावर आरोग्य विभाग आणि प्रशासन काम करत असल्याचे सांगण्यात आले.
महिला रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लँट
जिह्यात सोमवारी कोरोनाचे 555 रुग्ण सापडले. तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासनाने तयारी हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी बैठका झाल्या. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचे काम सुरू असून पुढील सहा ते आठ दिवसात तो सुरू होईल. मुख्य कोव्हिड सेंटर असलेल्या महिला रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रुग्ण असल्याने तेथे स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
आमदारांचा 1 कोटीचा निधी कोव्हिडसाठी
आमदार राजन साळवी यांच्या 1 कोटी आमदार निधीतून ओणी येथे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. सामंत यांचा 1 कोटीचा निधी 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांतील सुविधांसाठी वापरला जाणार आहे. आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम यांचाही निर्णय झाला आहे. त्या-त्या स्तरावर ते कोरोनासाठी आपला निधी खर्च करणार आहेत, अषी मेwिती यावेळी देण्यात आली.
रूग्णालयात येणाऱया नातेवाईकांचीही होणार कोरोना चाचणी
रूग्णालयात येणाऱया नातेवाईकांची कोव्हिड तपासणी करण्याच्या सूचना नुकत्याच करण्यात आल्या आहेत. रूग्णालयात कोरोना उपचार घेत असणाऱया रूग्णांना त्यांचे नातेवाईक भेटत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या रूग्णांचे कपडे धुण्यासाठी घरी पाठविण्यात येतात यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो यामुळे नातेवाईकांना रूग्णास भेटू न देण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
खाजगी हॉटेलचा पर्यायही लवकरच
कोरोना रूग्णांना खाजगी हॉटेलमध्ये भाडेतत्वावर राहाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हॉटेल असोसिएशन सोबत बैठक घेणार असून यामध्ये भाडे निश्चित करण्यात येणार आहे. ज्यांना होम आयसोलेशन शक्य नाही असे रुग्ण हा पर्याय निवडू शकतात, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
प्रशासन गतीमान ा उदय सामंत
जिह्यात आतापर्यंत 1 लाख 19 हजार 83 लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी 1 लाख 2 हजार 771 जणांना पहिला तर 16 हजार 312 लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. रेमडिसिव्हरची 100 इंजेक्शन्स असून आणखीन 400 इंजेक्शन्स प्राप्त होणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पाठपुरावा करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिह्यातील सुमारे 10 हजार 992 रिक्षाचालक, ज्येष्ठ कलावंत, संजय गांधी निराधार योजना यांचा आढावा घेऊन त्यांना मदत देण्याच्यादृष्टाने हालचाली सुरू झाल्या आहेत. जिह्यासाठी कोरोना लसीचे पाच हजार डोस आले असून आणखी पाच हजार डोस लवकरच येणार आहेत.