बेळगाव, जमखंडीतील दोघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. बुधवारी 205 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व जमखंडी येथील दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हय़ातील 529 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरातील 66, ग्रामीण भागातील 19 अशा तालुक्मयातील एकूण 85 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असणाऱया रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
चिदंबरनगर, क्लब रोड, वडगाव, देवराज अर्स कॉलनी, दूरदर्शननगर, हिंदवाडी, तानाजी गल्ली, हनुमाननगर, गुड्सशेड रोड, अशोकनगर, टीचर्स कॉलनी, भाग्यनगर, बिम्स क्वॉर्टर्स, रामतीर्थनगर, शिवाजीनगर, सोनार गल्ली वडगाव, टिळकवाडी, वीरभद्रनगर, यमनापूर परिसरात
पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
मजगाव, सहय़ाद्रीनगर, शहापूर, शाहूनगर, बेकिनकेरे, मच्छे, बाळेकुंद्री खुर्द, मुतगा, आनंदनगर, अंजनेयनगर, हुंचेनहट्टी, जेएनएमसी कॅम्पस, खासबाग, खमकारहट्टी, हलगीमर्डी, सुळेभावी, गणेशपूर परिसरातही बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांची संख्याही अधिक
आहे.
सध्या 1515 सक्रिय रुग्ण
दरम्यान, बुधवारी रात्री राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 20 हजार 575 वर पोहोचली आहे. बुधवारी 529 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 18 हजार 750 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1515 सक्रिय रुग्ण असून मृतांचा आकडा 310 वर पोहोचला आहे.
सांबरा एटीएसमधील 5 जवानांना बाधा
बुधवारी सात डॉक्टर व दहाहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बिम्समधील एका प्रमुख अधिकाऱयाचा समावेश आहे. खासगी इस्पितळातील पाचहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सांबरा एटीएसमधील पाच जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.