रविवारी 13 नवे रुग्ण, 15 जणांनी कोरोनावर मात
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील 649 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर रविवारी आणखी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनामुक्त झालेल्या 15 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. बाधितांमध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी शिंदोळी, हिरेबागेवाडी, शहापूर, रुक्मिणीनगर, महांतेशनगर, महालक्ष्मीनगर, भाग्यनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिकोडी व खानापूर तालुक्मयातील बरगाव येथेही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 414 इतकी झाली असून त्यापैकी 25 हजार 908 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 164 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 4 हजार 620 जणांचा अहवाल यायचा आहे. जिल्हय़ातील 50 हजारहून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
आतापर्यंत 4 लाख 20 हजार 584 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 87 हजार 159 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शाळा-कॉलेज सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व प्राध्यापकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून जिल्हय़ातील बाधित शिक्षकांचा आकडा 50 पार झाल्याची माहिती मिळाली आहे.
सुरुवातीला बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. आता विद्यार्थ्यांची तपासणी बंद करण्यात आली आहे. अद्याप जिल्हय़ातील अनेक शिक्षकांचे अहवाल यायचे आहेत. बेळगाव शहर व तालुक्मयातच 28 हून अधिक शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून सर्व अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.