आठ अधिकारी, 66 पोलिसांचा समावेश : नव्याने 99 कोरोना बाधित : दोघांचा मृत्यू
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस खात्यालाही मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत तब्बल 74 पोलीस अधिकारी आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये आठ अधिकारी व 66 पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान गुरुवारी आणखी 88 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सर्वच ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत आठ पोलीस अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी कोरोनावर मात करीत बरे झाले आहेत. पाच अधिकारी सध्या उपचाराखाली आहेत. तसेच 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 14 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 52 पोलीस उपचाराखाली आहेत. एकूण 74 पोलीस अधिकारी व पोलिसांना कोरोनाची लागण झाली. पैकी 17 जण कोरोनामुक्त झाले, तर 57 जण उपचाराखाली आहेत. यातील ज्या पोलीस अधिकारी व पोलिसांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशा पोलिसांना कोविड सेंटरमध्ये उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. लक्षणे नसणाऱयांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तसेच पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयाच्या स्वतंत्र इमारतीत आयसोलेशन करण्यात आले आहे. सर्व पोलिसांची विशेष काळजी घेण्यात येत असून कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलिसांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली.
88 पॉझिटिव्ह, दोन मृत्यू
गुरुवारी नव्याने आणखी 88 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 174 झाली आहे. कणकवली तालुक्मयातील एक आणि मालवण तालुक्मयातील एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे 33 जणांचे बळी गेले आहेत. तर आणखी 52 रुग्ण गुरुवारी बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 38 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 18611
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2174
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 16159
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 278
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1038
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 33
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1103
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8697
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12308