ओरोस, कसाल, खारेपाटणला पाणीच पाणी : कसाल बाजारपेठ, बसस्टँड जलमय : मालवणात सर्वाधिक 130 मि.मी. पावसाची नोंद
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात सलग पाच दिवस पावसाचा जोर असून रविवारी तर अक्षरशः मुसळधार पावसाने झोडपून काढले. ओरोस, कसाल परिसरात तर पाणीच पाणी झाले होते. कसाल बाजारपेठेतही पाणी घुसले होते. एसटी स्टँडचा भाग जलमय झाला होता. तर ओरोस जैताकर कॉलनीत पाणी साचले होते. खारेपाटण येथेही मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले होते. तसेच जिल्हय़ात बऱयाच भागात शेती पाण्याखाली गेली होती. छोटय़ा-छोटय़ा पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाली होती.
जिह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सलग पाच दिवस पाऊस कोसळत आहे. रविवारी दीप अमावस्येला अधिकच जोर होता. मुंबई-गोवा महामार्गचे काम करताना टाकलेल्या भरावामुळे ओरोस जैतापकर कॉलनीमध्ये पुन्हा एकदा पाणी साचून सर्व्हिस रोडवर आले होते. कसालमध्येही महामार्गाच्या कामांमुळे बाजारपेठेत पाणी घुसले होते.
खारेपाटणमध्ये पूरसदृश स्थिती
गेले दोन दिवस कोसळणाऱया संततधार पावसामुळे खारेपाटण येथील सुख नदीने धोक्मयाची पातळी ओलांडल्याने रविवारी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळच्या सुमारास पाण्याच्या पातळीमधे अचानक वाढ झाल्याने घोडेपाथर बंदर व जैनवाडी येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे बंदरवाडी, सम्यकनगर, जैनवाडी या वाडय़ांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे हे पाणी भरतीचे की धरणातून सोडले गेले, याबद्दल ग्रामस्थ व व्यापाऱयांमध्ये संभ्रम होता. पावसाचा जोर वाढल्यास व्यापारी पेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 130 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात सरासरी 70.800 मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण सरासरी 2415.800 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 44 (2200), सावंतवाडी 61 (2573), वेंगुर्ला 110.40 (2439.40), कुडाळ 52 (2256), मालवण 130 (3326), कणकवली 60 (2252), देवगड 70 (2227), वैभववाडी 39 (2053), असा पाऊस झाला आहे.