आरंभापासून जिल्हय़ात वाढ मंदावली. मात्र ती तीन अंकी संख्येवर व 300 ते 500 च्या दरम्यान सुरु होती. मात्र शुक्रवारी व त्यानंतर रविवारी वाढीचा आलेख 200 च्या खाली घसरल्याचा मोठा दिलासा लाभला असून रविवारी अहवालात चार महिन्यांनंतर प्रथमच 185 एवढय़ा निच्चांकी बाधित वाढीची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर 2.76 टक्के एवढय़ावर खाली आहे. यामध्ये जिल्हय़ातील इतर तालुक्यांसह हॉटस्पॉट फलटण व सातारा तालुक्यातील वाढ मंदावली असून सातारा तालुक्यात तब्बल चार महिन्यांनी फक्त 27 निच्चांकी बाधित वाढ नोंद झालेली आहे.
दरम्यान, जिह्यात रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 185 नागरिकांचे अहवाल बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला. सोमवारी सायंकाळी 840 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
फलटण सोडल्यास इतर तालुक्यांना दिलासा
जिल्हय़ात रविवारच्या अहवालानुसार फलटण (64 बाधित वाढ) सोडल्यास इतर तालुक्यात मंदावलेली वाढ जिल्हावासियांना गणेशोत्सवात सुटकेचा निश्वास टाकणारी ठरलेली आहे. खंडाळा, वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली हे गेल्या दोन तीन दिवसांपासून एक अंकावर आले आहेत. कराड, माण, खटाव, कोरेगावकरांनाही नवीन बाधित वाढीची गती कमी आल्याने चांगलाच दिलासा मिळाला आहे.
चार महिन्यांनी 185 निच्चांकी वाढ
तालुकानिहाय बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. फलटण 64 (36,009), सातारा 27 (50,307), कराड 17 (38,472), माण 18 (17,320), खटाव 16 (24,914), कोरेगाव 14 (21,467), खंडाळा 7 (13,978), वाई 5 (15,572), जावली 4 (9,903), पाटण 3 (10,118), महाबळेश्वर 2 (4,630), व इतर 8 (1,999) असे आज अखेर एकूण 2,44,689 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या माण 1, असे एकूण 1 असून आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6,019 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना मुक्ती 2 लाख 33 हजार पार
जिह्यात आजमितीस एकूण बाधितांची संख्या 2 लाख 44 हजार 689 एवढी झाली आहे. मात्र त्यापैकी 6 हजार 19 जणांचा मृत्यू झाला तर 2 लाख 33 हजार 61 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिले आहे. सोमवारी 840 जणांनी कोरोनावर मात केल्याने उपचारार्थ रुग्ण संख्येचा आलेख 9 हजारांच्या खाली असून एकूण उपचार्थ रुग्ण संख्या 8 हजार 556 असली तरी त्यापैकी प्रत्यक्ष कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 1 हजार 244 दाखल आहे तर 7 हजार 312 विविध कोरोना सेंटर वा होम आयसोलेट आहेत.
लसीकरणाचा वेग मंदावला
जिल्हय़ात गेल्या दोन तीन दिवसांपासून लसीकरणाचा वेग चांगलाच मंदावला आहे. सोमवारी कोव्हिन पोर्टलवर जिल्हय़ात दिवसभरात 1 हजार 197 जणांना लस मिळाली आहे. त्यामुळे एकूण लस घेतलेल्याची संख्या 21 लाख 19 हजार 556 झाली असून पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 15 लाख 21 हजार 663 एवढी दिलासादायक झालीय तर दुसरा डोस घेतल्या नागरिकांची संख्या 5 लाख 97 हजार 933 एवढी झालीय.