प्रतिनिधी/ रत्नागिरी
वाशी फळबाजारामध्ये हापूस आंब्याचा दर डझनाला 1500 ते 2000 रुपये तर पेटीचा दर 2 ते 5 हजार आह़े मात्र जिह्यात गुहागर तालुक्यामध्ये हापूसचा दर सर्वसामान्यांचा आवाक्यामध्ये असून 1500 रुपयांना दोन डझन आंबे मिळत आहेत.
जिल्हय़ामध्ये पहिल्या टप्प्यातील हापूस हंगामाचा जोर काही अंशी कमी झाला आह़े एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये हापूसची आवक मोठय़ा प्रमाणात होण्याचा अंदाज आह़े रत्नागिरी शहरामध्ये हापूसचा डझनाचा दर 600 ते 700 रुपये असून काही दिवसापूर्वी हाच दर 1500 ते 2000 रुपये होत़ा मात्र हापूसची आवक कमी त्यात ग्राहकांनी फिरवलेली पाठ यामुळे हे दर घसरल्याची माहिती येथील व्यापाऱयांनी दिली. वाशीसह अन्य फळबाजारामध्ये दाखल होणाऱया पेटय़ांची आवकदेखील घटली असून एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत पुन्हा हापूसची आवक वाढणार असल्याची माहिती बागायतदारांनी दिली.
खेड तालुक्यामध्ये विक्रीसाठी दाखल होणारा हापूस प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड येथील असून खेडमधील हापूस एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत बाजारामध्ये दाखल होत़ो त्यामुळे सध्या येथे 2 डझनाला 1800 रुपये दर मिळत आह़े लांजा तालुक्यामध्ये 600 ते 900 रुपये डझन तर पेटीचा दर 4 ते 5 हजार आह़े चिपळूण तालुक्यामध्ये हापूसच्या उत्पादनाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आह़े चिपळूणमधील प्रमुख बागायतदारांकडील हापूस अजूनही विक्रीला आला नसल्याची माहिती मिळत आह़े हंगामाच्या सुरुवातीला येथील कलमांना चांगला मोहोर आला मात्र विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे हा मोहोर गळून गेल़ा यामध्ये बचावलेल्या हापूसवर वाढत्या उष्णतेचा परिणाम होऊन उत्पादनात घट झाली असून अद्यापही अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारामध्ये दाखल झालेला नाह़ी दापोली तालुक्यामध्ये 2 डझन हापूस 3000 तर पेटीची 4 ते 5 हजारांनी विक्री होत आह़े